पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर ७ विकेट्सने मात
कॅनबेरा, 19 ऑक्टोबर (हिं.स.)पावसाच्या व्यत्ययामुळे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7 विकेट्सने पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पावसामुळे सामना चार वेळा थांबवण्यात आला. त्यामुळे सामना प्रत्येकी २६ षट
भारतीय क्रिकेट संघ


कॅनबेरा, 19 ऑक्टोबर (हिं.स.)पावसाच्या व्यत्ययामुळे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7 विकेट्सने पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पावसामुळे सामना चार वेळा थांबवण्यात आला. त्यामुळे सामना प्रत्येकी २६ षटकांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २६ षटकांत नऊ बाद १३६ धावा केल्या. डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १३१ धावांचे लक्ष्य होते. कर्णधार मिशेल मार्शच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने २१.१ षटकांत तीन बाद १३१ धावा करून सामना जिंकला.

टीम इंडियाने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मार्शने ऑस्ट्रेलियाकडून चांगली फलंदाजी केली आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. मार्श मात्र आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही, तो ५२ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांसह ४६ धावा करत नाबाद राहिला. मार्श व्यतिरिक्त, जोश फिलिपने ३७ धावा केल्या, तर मॅट रेनशॉ २१ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने आठ आणि मॅथ्यू शॉर्टने आठ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

पावसामुळे व्यत्यय आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने २६ षटकांत 9 बाद १३६ धावा केल्या होत्या . पावसामुळे सामना चार वेळा थांबवण्यात आला, ज्यामुळे षटकांमध्ये कपात करण्यात आली आणि सामना २६ षटकांपर्यंत कमी करण्यात आला. डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २६ षटकांत १३१ धावा करायच्या होत्या. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ३८ धावा केल्या, तर अक्षर पटेलने ३१ धावा केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande