तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमला विश्वचषक अंतिम फेरीत कांस्यपदक
बीजिंग, १८ ऑक्टोबर, (हिं.स.) : भारताची स्टार तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमने इतिहास रचला आहे. तिने विश्वचषक अंतिम फेरीत प्रभावी कामगिरी करून कांस्यपदक पटकावले आहे. ही कामगिरी करणारी ज्योती पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे. आशियाई क्रीडा स
ज्योती सुरेखा वेन्नम


बीजिंग, १८ ऑक्टोबर, (हिं.स.) : भारताची स्टार तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमने इतिहास रचला आहे. तिने विश्वचषक अंतिम फेरीत प्रभावी कामगिरी करून कांस्यपदक पटकावले आहे. ही कामगिरी करणारी ज्योती पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती ज्योतीने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या एला गिब्सनला १५०-१४५ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. ज्योतीने सामन्यात तिच्या १५ बाणांपैकी १५ बाणांवर १० गुण मिळवून कांस्यपदक निश्चित केले.

ज्योतीने उपांत्यपूर्व फेरीमध्ये अमेरिकेच्या ऍलेक्सिस रुईझला १४३-१४० असा पराभव करून स्पर्धेची सुरुवात केली. उपांत्य फेरीत तिचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची आंद्रिया बेसेराशी झाला. या सामन्यात तिला १४३-१४५ असा पराभव पत्करावा लागला. ज्योतीने ८७-८६ अशी आघाडी घेतली होती. पण बेसेराने तिन्ही बाणांवर १० गुण मिळवून आघाडी उलटवली. बेसेराने शेवटचा टोक २९-२८ असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

ज्योतीने कांस्यपदकाच्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले. पाचही टोकांमध्ये १० गुण मिळवत गिब्सनला पोडियमवर नेले. हा ज्योतीचा तिसरा विश्वचषक अंतिम सामना होता. यापूर्वी २०२२ (त्लाक्सकाला) आणि २०२३ (हर्मोसिलो) मध्ये तिला पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले होते. आणखी एक भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज, मधुरा धामणगावकरने देखील स्पर्धेत प्रवेश केला होता. पण मेक्सिकोच्या मारियाना बर्नालकडून १४२-१४५ असा पराभव पत्करल्याने तिला पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले.

पुरुषांच्या कंपाऊंड स्पर्धेत ऋषभ यादव हा भारताचा एकमेव प्रतिनिधी आहे. जो दिवसाच्या शेवटी दक्षिण कोरियाच्या किम जोंगोविरुद्ध आपली मोहीम सुरू करेल. यावेळी कोणताही भारतीय तिरंदाज रिकर्व्ह स्पर्धेत पात्र ठरू शकला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande