नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर (हिं.स.) - प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (पीएम जनमन) या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल महिला आणि बालविकास मंत्रालयाला विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडून मंत्रालयाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. हा सन्मान नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित ‘आदि कर्मयोगी अभियान’ राष्ट्रीय संमेलनादरम्यान प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी व्यवहार मंत्रालयाने केले होते.
पीएम जनमन योजनेअंतर्गत विशेषतः असुरक्षित आदिवासी गट (पीव्हीटीजी) क्षेत्रांमध्ये 2000 हून अधिक अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, ज्यामुळे अंतिम टप्प्यावरील आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणास चालना मिळाली आहे.
या सन्मानाद्वारे महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या ‘विकसित भारत 2047’ या दृष्टीकोनाशी सुसंगत प्रयत्नांची दखल घेण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी