नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल गरळ ओकणे काँग्रेसचे नित्यकर्म बनल्याची टीका राष्ट्रीय मुस्लिम मंचचे संयोजक इंद्रेशकुमार यांनी केलीय. कर्नाटक काँग्रेसचे प्रियंका खर्गे यांनी राज्यात संघाच्या कार्यक्रमांवर प्रतिबंध लावण्याची मागणी केली होती. त्यापार्श्वभूमीवर इंद्रेश कुमार यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
प्रियांक खरगे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांना शासकीय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आरएसएसच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नयेत अशी विनंती केली होती. संघाच्या कार्यक्रमात तरुणांचे ब्रेनवॉश केले जाते, ज्यामुळे देशाला किंवा समाजाला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे शासकीय शिक्षण संस्था आणि मंदिरांमध्ये संघाच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये. तसेच सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही संघटनेचे सदस्य होणे किंवा तिच्या उपक्रमात भाग घेणे यावर पूर्णपणे बंदी घालावी.
यासंदर्भात इंद्रेशकुमार म्हणाले की, स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्याऐवजी देशाचे विभाजन करणे हे सततचे दुर्दैव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणे त्या पक्षाची सवय बनली आहे. आता संघाबद्दल गरळ ओकणे काँग्रेस पक्षाची सवय बनली आहे. काँग्रेसने संघ समजून घेणे आवश्यक असल्याचे इंद्रेश कुमार यांनी सांगितले.
यासोबतच भाजपने देखील काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे कर्नाटक प्रमुख विजयेंद्र येदियुरप्पा म्हणाले की, की यातून काँग्रेसची विकृत आणि हिंदू विरोधी मानसिकता दिसून येते.राज्य सरकारवर संघाच्या कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा आरोप करून त्यांनी म्हटले, ज्यांनी पूर्वी देशावर लोकशाहीवर आक्षेप आणून इमरजन्सी लावण्याच्या आणि लोकशाही व्यवस्थेचा गालाघाट करुन बदनामी केली ती काँग्रेस आता कर्नाटकातही त्या मार्गावर आहे. इतिहास साक्षी आहे की जर विभाजन करणाऱ्या राजकारणाला आणि तानाशाही वृत्तीला प्रोत्साहन दिले गेले तर या देशाचे लोक त्यांना इतिहासाच्या पानांप्रमाणे नष्ट करू शकतात.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी