रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे बोर्ड वॉर रूमला दिली भेट
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे बोर्डाच्या वॉर रूमला भेट दिली. या भेटीत त्यांनी या सणाच्या हंगामातील प्रवाशांशी संबंधित घडामोडींचा आढावा घेतला. संपूर्ण आठवडा, दिवसाचे चोवीस तास काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच
Ashwini Vaishnav


नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे बोर्डाच्या वॉर रूमला भेट दिली. या भेटीत त्यांनी या सणाच्या हंगामातील प्रवाशांशी संबंधित घडामोडींचा आढावा घेतला. संपूर्ण आठवडा, दिवसाचे चोवीस तास काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले तसेच, दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छाही दिल्या. सणासुदीच्या काळात प्रवाशांद्वारा मागणीत झालेल्या वाढीची पूर्तता करण्यासाठी भारतीय रेल्वेने व्यापक व्यवस्था केली आहे. पूजा, दिवाळी आणि छठच्या उत्सवादरम्यान प्रवासात अडचण येऊ नये यासाठी, यंदा भारतीय रेल्वे 12,011 विशेष गाड्या चालवत आहे, तर मागील वर्षी याच कालावधीत 7,724 गाड्या चालवल्या गेल्या होत्या. सणासुदीच्या हंगामात गर्दी वाढल्याच्या परिस्थितीतही प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि आरामदायक व्हावा यासाठी भारतीय रेल्वे पूर्ण क्षमतेने काम करत आहे. सणाच्या निमित्ताने प्रवाशांची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वेने 1 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2025 या दरम्यान नियमित गाड्यांव्यतिरिक्त, 3,960 विशेष गाड्या यशस्वीरित्या चालवल्या आहेत. भारतातील रेल्वेने दिवाळी आणि छठ सणानिमित्त प्रवाशांची वाढीव संख्या लक्षात घेत येत्या काही दिवसांत सुमारे 8,000 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखली आहे. या विशेष गाड्या भारतीय रेल्वेच्या सर्व झोनमध्ये चालवल्या जात आहेत; उत्तर रेल्वे (1919 गाड्या), मध्य रेल्वे (1998 गाड्या) आणि पश्चिम रेल्वे (1501 गाड्या) अशा सर्वाधिक गाड्यांचे नियोजन आहे. इतर झोन — जसे की पूर्व मध्य रेल्वे (1217) आणि उत्तर पश्चिम रेल्वेने (1217) प्रादेशिक प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त सेवा उपलब्ध केल्या आहेत. एकूण 12,011 गाड्यांचे झोननिहाय वितरण पुढे दिले आहे. 1 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2025 या कालावधीत या विशेष सेवांचा 1 कोटीहून अधिक प्रवाशांनी लाभ घेतला आहे. प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वतंत्र प्रतीक्षा क्षेत्रे, अतिरिक्त तिकीट खिडक्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छ प्रसाधनगृहे या सुविधांचा त्यात समावेश असून यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. नवी दिल्ली परिसरातील नवी दिल्ली, दिल्ली, आनंद विहार, हजरत निजामुद्दीन आणि शकूर बस्ती स्थानकांवरून 16 ते 19 ऑक्टोबर 2025 दरम्यान एकूण 15.17 लाख प्रवाशांनी प्रवास केला. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या 13.66 लाख प्रवाशांच्या तुलनेत ही संख्या 1.51 लाखांनी अधिक आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्ली आणि आनंद विहार रेल्वे स्थानकांना भेट देऊन प्रवाशांशी संवाद साधला आणि रेल्वेकडून करण्यात आलेल्या व्यवस्थांबाबत अभिप्राय घेतला. विशेष व्यवस्थांमध्ये उपरोल्लेखित सुविधांसह गाड्यांच्या वेळापत्रकाचे प्रदर्शन आणि इतरही सुविधांचा समावेश आहे. भारतीय रेल्वे सर्व प्रवाशांना सणासुदीच्या गर्दीत सुरक्षित, आरामदायी आणि विनाअडथळा प्रवास देण्यासाठी कटिबद्ध आहे. 12 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचारी दिवस-रात्र अखंड मेहनत घेत असून प्रत्येक प्रवाशाला सुखद आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कार्यरत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande