तिकीट नाकारल्यामुळे राजद नेत्याचा राबडी यांच्या निवासस्थानाबाहेर कुर्ता फाडून निषेध
पाटणा, 19 ऑक्टोबर (हिं.स.)पूर्व चंपारण जिल्ह्यातील मधुबन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय जनता दलाचे माजी उमेदवार मदन शाह रविवारी राबडी देवीच्या निवासस्थानाबाहेर रडले. पक्षाचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी त्यांचा कुर्ता फाडला आणि अश्रू ढाळले. निदर्शन
राजदचे माजी उमेदवार मदन शाह


पाटणा, 19 ऑक्टोबर (हिं.स.)पूर्व चंपारण जिल्ह्यातील मधुबन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय जनता दलाचे माजी उमेदवार मदन शाह रविवारी राबडी देवीच्या निवासस्थानाबाहेर रडले. पक्षाचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी त्यांचा कुर्ता फाडला आणि अश्रू ढाळले. निदर्शनादरम्यान त्यांनी तेजस्वी यादव यांचे राजकीय सल्लागार संजय यादव यांच्यावर तिकीट विकल्याचा गंभीर आरोप केला. राज्यसभेचे खासदार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी संजय यादव यांनी त्यांच्याकडून दोन कोटी सत्तर लाख रुपये मागितल्याचा आरोप मदन शाह यांनी केला. पैसे न दिल्याने त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले. ते निराश झाले आहेत. त्यांनी निवडणुकीसाठी त्यांच्या मुला-मुलींचे लग्नही पुढे ढकलले. गेल्या वेळी ते थोड्या फरकाने पराभूत झाले होते. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनीच त्यांना तयारी करण्याचा सल्ला दिला होता. पण या प्रकरणावर पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

मदन शाह यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत मधुबनमधून आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. आणि त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या राणा रणधीर सिंह यांनी फक्त ५,८७८ मतांनी पराभव केला होता. त्या पराभवानंतर पक्षाने त्यांना प्रोत्साहन दिले आणि पुढच्या वेळी संधी देण्याचे आश्वासन दिले. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मदन शाह यांच्यावर आरजेडी उमेदवाराऐवजी एनडीए उमेदवाराला गुप्तपणे मदत केल्याचा आरोप होता. यात त्यांच्या भूमिकेमुळे जेडीयूच्या लवली आनंद यांनी आरजेडी उमेदवार रितू जयस्वाल यांचा जवळपास ३०,००० मतांनी पराभव केला, असा आरोप आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande