कॅनबेरा, 19 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने पर्थ येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. तो ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक सामने खेळले आहेत.
रोहित आणि कोहली २२४ दिवसांनंतर भारतीय जर्सीमध्ये परतले आहे. पण रोहित शर्माचे पुनरागमन संस्मरणीय ठरले नाही. आणि तो मोठी खेळी खेळू शकला नाही. रोहित २२४ दिवसांनंतर भारतासाठी खेळला पण तो फक्त १६ मिनिटे क्रीजवर राहू शकला. तो जोश हेझलवूडच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. तो १४ चेंडूत 8 धावा काढून बाद झाला.
रोहित मोठी खेळी खेळू शकला नाही, तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळताच त्याने ही कामगिरी केली. रोहितचा हा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे. ज्यामुळे तो इतके सामने खेळणारा पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितपूर्वी केवळ सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि राहुल द्रविड यांनीच ५०० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले क्रिकेटपटू
664 - सचिन तेंडुलकर
652 - एम जयवर्धने
५९४ - के संगकारा
586 - सनथ जयसूर्या
560 - रिकी पाँटिंग
५५१ - विराट कोहली
538 - एमएस धोनी
५२४ - शाहिद आफ्रिदी
519 - जॅक कॅलिस
५०९ - राहुल द्रविड
५०० - रोहित शर्मा
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ३५० सामने खेळणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून भारतासाठी ३४६ सामने खेळले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे