अमेरिकेचा कॅरिबियन समुद्रात संशयित पाणबुडीवर हल्ला
वॉशिंग्टन , 19 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेने कॅरिबियन समुद्रातील एका संशयित पाणबुडीवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले की, या पाणबुडीद्वारे फेंटानिल या अतिधोकादायक ड्रग्सची अमेरिकेमध्ये तस्करी केली जात होती. त्या
अमेरिकेचा कॅरिबियन समुद्रात संशयित पाणबुडीवर हल्ला


वॉशिंग्टन , 19 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेने कॅरिबियन समुद्रातील एका संशयित पाणबुडीवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले की, या पाणबुडीद्वारे फेंटानिल या अतिधोकादायक ड्रग्सची अमेरिकेमध्ये तस्करी केली जात होती. त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्यात दोन ड्रग तस्कर ठार झाले, तर उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या मूळ देशांमध्ये इक्वाडोर आणि कोलंबिया येथे परत पाठवले जात आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “एका मोठ्या प्रमाणावर ड्रग्स घेऊन येणाऱ्या पाणबुडीचा नाश करणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट होती. ही पाणबुडी एक प्रसिद्ध अमली पदार्थ तस्करीच्या मार्गावरून अमेरिका दिशेने येत होती.” ते पुढे म्हणाले की, ही पाणबुडी फेंटानिल आणि इतर अमली पदार्थांनी भरलेली होती. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, पाणबुडीवर चार तस्कर होते. यातील दोनजण अमेरिकेच्या हल्ल्यात ठार, तर इतर दोन ताब्यात घेतले गेले. या दोघांना त्यांच्या मूळ देशांमध्ये कोलंबिया आणि इक्वाडोर येथे हवाली करण्यात येत आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला की, जर ही पाणबुडी अमेरिकेत पोहोचली असती, तर तिच्यातील ड्रग्समुळे किमान २५,००० अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला असता.

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी देखील अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या कोलंबियन नागरिकाबाबत पुष्टी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “आम्हाला आनंद आहे की तो जिवंत आहे आणि त्याच्यावर कायद्यानुसार खटला चालवला जाईल.”

ही कारवाई अशा वेळी घडली आहे जेव्हा अध्यक्ष ट्रम्प यांनी ड्रग तस्करीविरोधात आक्रमक मोहिम राबवलेली आहे. याअंतर्गत त्यांनी व्हेनेझुएलामधून अमेरिका दिशेने येणाऱ्या कथित ड्रग तस्करी करणाऱ्या नौकांवर हल्ले चढवले आहेत. तथापि, या अलीकडील पाणबुडीवरील हल्ल्याच्या प्रकरणातही अमेरिकेने असा कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही, ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकेल की या पाणबुडीवर खरोखरच ड्रग तस्कर होते.अमेरिकेने ही पाणबुडी नक्की कुठून येत होती हेही स्पष्ट केलेले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande