अहमदाबाद कसोटी : दिवसअखेर भारत 121/2; केएल राहुलचे नाबाद अर्धशतक
अहमदाबाद, 2 ऑक्टोबर (हिं.स.)अहमदाबाद कसोटीच्या पहिला दिवसाचा खेळ थांबवला तेव्हा भारताने ३८ षटकांत 2 विकेट्स गमावून १२१ धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा केएल राहुल ११४ चेंडूत ५३ धावांवर नाबाद होता. तर कर्णधार शुभमन गिल ४२ चेंडूत १८ धावांवर नाबाद
केएल राहुल


अहमदाबाद, 2 ऑक्टोबर (हिं.स.)अहमदाबाद कसोटीच्या पहिला दिवसाचा खेळ थांबवला तेव्हा भारताने ३८ षटकांत 2 विकेट्स गमावून १२१ धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा केएल राहुल ११४ चेंडूत ५३ धावांवर नाबाद होता. तर कर्णधार शुभमन गिल ४२ चेंडूत १८ धावांवर नाबाद होता. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या अजूनही 41 धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान भारताने सलामीवीर यशस्वी जयस्वाल 36 धावांवर आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज साई सुदर्शन अवघ्या ७ धावांवर बाद झाला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने 68 धावांची दमदार सलामी भारतीय संघाला दिली. पण यशस्वी जयस्वाल चांगल्या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या खेळीत करु शकला नाही. आता बाद झाला. आता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या संघावर मोठी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असेल.

तत्पूर्वी, नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात फक्त १६२ धावांवर गारद झाला. जस्टिन ग्रीव्हजने ४८ चेंडूत ३२ धावा काढत विरोधी संघाकडून सर्वाधिक धावा काढल्या.भारताकडून मोहम्मद सिराजने पहिल्या डावात चार आणि जसप्रीत बुमराहने तीन विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही एक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande