आयएल टी- 20 लीगमध्ये अश्विनला लिलावात खरेदीदार मिळाल नाही
नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर (हिं.स.) टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विनला आयएल टी-२० लीगमध्ये कोणताही खरेदीदार मिळाला नाही. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडियन प्रीमियर लीगसह भारतीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेला अश्विन लीगच्य
आर अश्विन


नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर (हिं.स.) टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विनला आयएल टी-२० लीगमध्ये कोणताही खरेदीदार मिळाला नाही. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडियन प्रीमियर लीगसह भारतीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेला अश्विन लीगच्या पहिल्या लिलावात अंदाजे १.०६ कोटी रुपये किंमत वर्गात होता.

कोणत्याही फ्रँचायझीने त्याला खरेदी करण्यास रस दाखवला नाही. आणि जेव्हा त्याचे नाव लिलावात पहिल्यांदा आले तेव्हा तो विक्रीला आला नाही. प्रत्येक फ्रँचायझीकडे ८००,००० डॉलर्स एवढी लिलाव रक्कम होती. तसेच उर्वरित १.२ दशलक्ष डॉलर्सचे पूर्वी थेट करार आणि रिटेन्शनसाठी वाटप केले होते.

गेल्या महिन्यात अश्विनला बिग बॅश लीगच्या १५ व्या हंगमासाठी सिडनी थंडरने करारबद्ध केले होते. १४ डिसेंबर ते २५ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या बीबीएलच्या दुसऱ्या सहामाहीसाठी तो उपलब्ध असणार आहे.

अश्विनने इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घोषणा केली होती. ज्यामुळे तो जगभरातील लीगमध्ये खेळण्यास पात्र ठरला. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यभागी या फिरकी गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

माजी भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या टी-२० लीग, बिग बॅश लीगमध्ये सामील होऊन इतिहास रचला आहे. सिडनी थंडरने त्याच्या कराराची घोषणा केली. यासह अश्विन अधिकृतपणे बीबीएल संघात सहभागी होणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande