पंतप्रधान मोदींकडून काँग्रेस अध्यक्ष खर्गेच्या प्रकृतीची फोनवरुन विचारपूस
नवी दिल्ली, २ ऑक्टोबर (हिं.स.). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिले की, त्यांनी मल्लिकार्ज
पंतप्रधान मोदी आणि खर्गे यांचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, २ ऑक्टोबर (हिं.स.). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिले की, त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. खर्गे यांच्या सतत चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी कर्नाटकचे आयटी मंत्री प्रियांक खर्गे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिले होते की, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पेसमेकर इम्प्लांटची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. ही एक किरकोळ प्रक्रिया होती आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी सांगितले की, मल्लिकार्जुन खर्गे ३ ऑक्टोबर रोजी आपले कामकाज करण्यासाठी परततील आणि त्यांच्या सर्व नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande