भारतीय खेळाडूंनी दिल्या देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : दिवाळीनिमित्त, सचिन तेंडुलकरसह अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, तुम्हाला आनंदी आणि सुरक्षित
सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : दिवाळीनिमित्त, सचिन तेंडुलकरसह अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, तुम्हाला आनंदी आणि सुरक्षित दिवाळीच्या शुभेच्छा. आनंद घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी लिहीले की, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एक अद्भुत आणि आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत! प्रकाशाचा हा सण तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. सुरक्षित आणि आनंदी दिवाळी जावो. माजी भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाणने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे, ही दिवाळी तुमचे जीवन शांती, समृद्धी आणि अंतहीन आनंदाने भरून जावो. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज यांनी X पोस्टमध्ये लिहिले आहे, जसा प्रकाश प्रत्येक घराला प्रकाश देतो, त्याचप्रमाणे प्रत्येक हृदयात शांती आणि आनंद वास करील. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! श्रेयस अय्यर यांनी लिहिले आहे, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! तुमचे जीवन प्रकाश, प्रेम आणि अंतहीन आनंदाने भरलेले राहो. भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने लिहिले, प्रकाश, आनंद आणि भरपूर सकारात्मकता. तुम्हा सर्वांना चमकदार दिवाळीच्या शुभेच्छा! भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी लिहिले, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! या पवित्र सणाच्या प्रकाशाने सर्व अंधकार दूर होवो! माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने लिहिले, दिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्या जीवनाला शांती, समृद्धी आणि आनंदाने उजळून टाको. तुम्हा सर्वांना उज्ज्वल आणि सुंदर दिवाळीच्या शुभेच्छा!

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande