पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाची एक कोटी ३८ लाख रुपयांची, तर धायरीतील एका तरुणाची १९ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाणे आणि नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर परिसरातील एका व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीसंबंधी लिंक पाठवून विविध योजनांची माहिती दिली. सुरुवातीला व्यावसायिकाने केलेल्या छोट्या गुंतवणुकीवर चोरट्यांनी परतावा दिला.त्यातून विश्वास बसल्यानंतर व्यावसायिकाने एक कोटी ३८ लाख रुपये गुंतविले. मात्र, त्यानंतर चोरट्यांनी कोणताही परतावा दिला नाही. याबाबत व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु