सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
इन्स्टाग्रामवर ओळख करून तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा गुन्हा सदर बझार ठाण्याच्या हद्दीत घडला. तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’ व ॲट्रॉसिटी अंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्या तरुणास तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. रोहित घोडके असे त्या संशयिताचे नाव आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये गल्लीतील एका तरुणाने इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. सुरवातीला त्याठिकाणी बोलून ओळख वाढविली. काही दिवसांनी मैत्री करून मोबाईल नंबर घेतला. दोघेही एकमेकांना नेहमी बोलू लागले. ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे’ असे म्हणून रोहितने त्या १६ वर्षांच्या मुलीचा सतत पाठलाग केला. एकेदिवशी ७० फूड रोडवर वाटेत अडवून त्याने कांद्याच्या दुकानात नेले. त्याठिकाणी मनास लज्जा वाटेल असे कृत्य त्याने केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड