लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील पोलिसांनीपोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या घरी जाऊन चौकशी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे
दीपावली सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून दीपावली सण शांतवेत व निर्विघ्नपणे पार पडावे, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वेळीच कारवाई करून त्यांच्याकडून समाजविघातक कृत्य घडू नये यासाठी अचानकपणे संपूर्ण जिल्ह्यात सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्यासाठी ऑलआउट व कॉबिंग ऑपरेशनचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले.शत्र बाळगणाऱ्या गुन्हे दाखल करण्यात आले, यामध्ये लातूर जिल्हा पोलीस दलातील ५८ पोलीस अधिकारी तर २१२ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis