स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन
नवी दिल्ली , 20 ऑक्टोबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या निमित्ताने देशवासियांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरून देशातील जनतेला भारतीय वस्तू खरेदी करण्यास सांगितले असून असेही म्हटले आहे की, खरेदी
पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना भारतीय उत्पादने खरेदी करण्याचे केले आवाहन


नवी दिल्ली , 20 ऑक्टोबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या निमित्ताने देशवासियांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरून देशातील जनतेला भारतीय वस्तू खरेदी करण्यास सांगितले असून असेही म्हटले आहे की, खरेदी केल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करा. असे केल्याने तुम्ही इतरांनाही देशी वस्तू खरेदी करण्यासाठी प्रेरित कराल.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये लिहिले,“चला, या सणाच्या हंगामात 140 कोटी भारतीयांचे परिश्रम, सर्जनशीलता आणि नवोपक्रमांचा उत्सव साजरा करूया. चला, भारतीय उत्पादने खरेदी करूया आणि अभिमानाने म्हणूया – हे स्वदेशी आहे! तुम्ही जे काही खरेदी केले आहे, ते सोशल मीडियावर शेअर करा. यामुळे इतरांनाही असे करण्यासाठी प्रेरणा मिळेल.”

पंतप्रधान मोदी यांनी ‘माय गव्हर्नमेंट इंडिया’ या अधिकृत खात्याचा एक पोस्ट शेअर करत स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते. हे खाते देशवासीयांना सरकारशी जोडण्याचे काम करते आणि सरकारी धोरणे सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवते. माय गव्हर्नमेंट इंडिया च्या पोस्टमध्ये लिहिले होते, “आपण सर्वजण स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहोत! या दिवाळीत, चला फक्त स्वदेशी उत्पादने खरेदी करूया आणि स्थानिक कारागिरांना पाठिंबा देण्याचा संकल्प करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला ‘वोकल फॉर लोकल’साठी प्रेरित करत आहेत. तुम्ही जे स्वदेशी उत्पादन खरेदी केले आहे किंवा त्याचे उत्पादक यांच्यासोबतची सेल्फी सोशल मीडियावर शेअर करा.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande