नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर (हिं.स.) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आपला 60वा वाढदिवस साजरा करत आहेत. या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमित शाह यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया ‘एक्स’वर एक पोस्टमध्ये म्हटले, “गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जनसेवेबद्दल त्यांची निष्ठा आणि कष्टाळूपणा यामुळे त्यांना सर्वत्र मोठा सन्मान मिळतो.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “भारताच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेला त्यांनी बळकटी दिली आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षित व सन्मानपूर्वक जीवन मिळावे यासाठी त्यांनी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. मी त्यांच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना करतो.”
अमित शहा यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत एका गुजराती कुटुंबात झाला होता. भारताचे गृहमंत्री होण्यापूर्वी ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, गुजरात राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे महासचिव देखील राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते गांधीनगर मतदारसंघातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले.2014 च्या निवडणुकांमध्ये, जेव्हा भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले, तेव्हा अमित शहा यांना राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेश राज्याची जबाबदारी देण्यात आली होती.
देशाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपला प्रचंड बहुमत दिले आणि उत्तर प्रदेशमधून पक्षाला 73 जागा मिळाल्या. त्यावेळी भाजपचा मतप्रतिशत 42% पर्यंत पोहोचला होता. ही यशस्वी कामगिरी पक्षासाठी एक मोठा विजय होता आणि अमित शहा यांच्या रणनीती कुशलतेचा ठोस पुरावा देखील ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode