शिलाँग, २२ ऑक्टोबर (हिं.स.) तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय मैत्री स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाला इराणकडून ०-२ असा पराभव सहन लागला.जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इराणची बदली खेळाडू सारा दिदारने दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करून पाहुण्या संघाला विजय मिळवून दिला.
पहिला हाफ गोलरहित राहिला. पण दुसऱ्या हाफमध्ये इराणने खेळ पूर्णपणे त्यांच्या बाजूने वळवला. दिदारने ६४ व्या आणि ७४ व्या मिनिटाला दोनदा भारतीय बचावफळीला भेदून टाकले. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऐतिहासिक एएफसी महिला आशियाई कप पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणारा भारत या सामन्यात निराशाजनक दिसत होता. इराणी संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट समन्वय आणि शारीरिक ताकद दाखवत खेळाची गती नियंत्रित केली.
सामन्याच्या सुरुवातीला चौथ्या मिनिटाला भारताला धोक्याचा सामना करावा लागला जेव्हा गोलकीपर एलांगबाम पंथोई चानू चेंडू योग्यरित्या हाताळण्यात अपयशी ठरली. पण फंजौबाम निर्मला देवी यांनी शेवटच्या क्षणी गोल करून भारताला सुरुवातीच्या पराभवापासून वाचवले.
६४ व्या मिनिटाला भारतीय बचाव फळीने मेलिका मोटेवालिताहेरचा एक परिपूर्ण क्रॉस चुकवला. झहरा घनबारीचा हेडर क्रॉसबारला लागला आणि चेंडू सारा दिदारच्या मार्गावर पडला आणि तिने गोल केला.दहा मिनिटांनंतर, ७४ व्या मिनिटाला, दिदारने रतनबाला देवीच्या चुकीचा फायदा घेत नेटमध्ये एक कमी प्रहार केला.
भारताचा पहिला अचूक प्रयत्न ८९ व्या मिनिटाला झाला जेव्हा लिंडा कोम सेर्टोचा फ्री-किक इराणी गोलकीपर राहा याजदानीने उत्कृष्टपणे वाचवला. अतिरिक्त वेळेत इराण तिसरा गोल करण्याच्या जवळ पोहोचला होता. पण फतेमेह शाबान घोरौदचा प्रहार पोस्टवर आदळला. भारताचा सामना आता २७ ऑक्टोबरला नेपाळशी, तर २४ ऑक्टोबरला इराणचा सामना नेपाळशी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे