रोमहर्षक लढतीत ऑस्ट्रेलियाची भारतावर 2 विकेट्सने मात
कॅनबेरा, 23 ऑक्टोबर (हिं.स.)ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने अटीतटीच्या लढतीत भारताचा दोन विकेट्सने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-०
भारतीय क्रिकेट संघ


कॅनबेरा, 23 ऑक्टोबर (हिं.स.)ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने अटीतटीच्या लढतीत भारताचा दोन विकेट्सने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. २५ ऑक्टोबर रोजी सिडनी येथे शेवटचा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने ऍलेडमध्ये २६५ धावांचे लक्ष्य ४६.२ षटकांत आठ विकेट्स गमावून पार केले. मॅथ्यू शॉर्टने ७४ धावा केल्या, तर कूपर कॉनोली६१ धावांवर नाबाद राहिला. भारताच्या हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली. १७ धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यांनी दोन विकेट्स गमावल्या होत्या. कर्णधार शुभमन गिल 9 धावांवर बाद झाला आणि विराट कोहली एकही धाव न काढता बाद झाला. दोघांनाही झेवियर बार्टलेटने बाद केले. त्यानंतर रोहित आणि अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रोहित शर्माने सर्वाधिक ७३ धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने ६१ धावा केल्या.

भारताने २९.२ षटकांत २ गडी गमावून १३५ धावा केल्या होत्या. सुरुवातीला खूप संथ खेळणाऱ्या रोहित आणि अय्यर दोघांनीही वेगाने धावा काढायला सुरुवात केली. मिशेल स्टार्कच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना रोहित हेझलवूडने झेलबाद केला. त्यानंतर काही वेळातच अय्यरही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याची विकेट ऍडम झम्पाने घेतली.

शेवटी, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी भारताची धावसंख्या २५४ धावांवर नेली. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने ४, झेवियर बार्टलेटने ३ आणि मिशेल स्टार्कने २ विकेट्स घेतल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande