शेती आणि गोसंवर्धन हे भारतीय संस्कृतीचे मूळ - हंसराज अहीर
चंद्रपूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। गोवर्धन पूजा ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचे आणि शेतकऱ्यांच्या जीवनमूल्यांचे प्रतीक आहे. भारताची खरी ओळख ही शेती, गाई-गुरे आणि निसर्गाशी असलेल्या नात्यात आहे. या पूजेद्वारे आपण निसर्गाबद्दल, आपल्
शेती आणि गोसंवर्धन हे भारतीय संस्कृतीचे मूळ - हंसराज अहीर


चंद्रपूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।

गोवर्धन पूजा ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती आपल्या संस्कृतीचे आणि शेतकऱ्यांच्या जीवनमूल्यांचे प्रतीक आहे. भारताची खरी ओळख ही शेती, गाई-गुरे आणि निसर्गाशी असलेल्या नात्यात आहे. या पूजेद्वारे आपण निसर्गाबद्दल, आपल्या मातीतल्या देवतांबद्दल आणि गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. शेती आणि गोसंवर्धन हे भारतीय संस्कृतीचे मूळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केले.

दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी शास्त्रीनगर प्रभाग आणि कानिफनाथ बहुउद्देशीय संस्था, नेहरू नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू नगर येथे भव्य गोवर्धन पूजा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला मोर्चा शहर अध्यक्षा छबू वैरागडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी, भाजप नेते प्रकाश देवतळे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande