लातूर : तीन मोटारसायकल चोरांना अटक
दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त लातूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.): लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन मोटारसायकल चोरांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांचे निर्देशान्व
लातूर गुन्हे शाखेकडून तीन मोटारसायकल चोरांना अटक  दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त


दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त

लातूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.): लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन मोटारसायकल चोरांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर व परिसरात मोटारसायकल चोरीच्या तक्रारी वाढत होत्या. याबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणावेत, अशा सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अधिकारी/ अमलदाराकडून कारवाई करण्यात येत होती.

पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी भांबरी चौक, रिंग रोड परिसरात सापळा रचला. यावेळी वसवाडी (ता. लातूर) येथील बार्शी रोड रेल्वे उड्डाण पुलाजवळ तीन संशयित इसम चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे

1)कृष्णा जगन्नाथ भोसले (वय 28, रा. पाखरसांगवी),

2)जितीन सहदेव गायकवाड (वय 19, रा. काळमाथा, ता. औसा)

3)सौरभ सुभाष भोळे (वय 19, रा. सोना नगर, लातूर) अशी सांगितली.

तपासादरम्यान त्यांनी दोन मोटारसायकली एक होंडा सीबी शाईन आणि एक हिरो होंडा पॅशन प्रो या काही दिवसांपूर्वी बार्शी रोड परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. सदर दोन्ही मोटारसायकली अंदाजे 01 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पुढील चौकशीत आरोपी कडून आणखी मोटारसायकल चोरीची कबुली ची शक्यता आहे.

नमूद आरोपींना एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 770/2025 आणि 771/2025 कलम 331(2) बीएनएस अंतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, सफौ सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, युवराज गिरी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, गोविंद भोसले यांनी केली आहे.

नागरिकांनी आपल्या वाहनांवर सुरक्षा साधने बसवावीत आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande