
अकोला, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। अकोला शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या चहाच्या दुकानाची एका युवकाने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाने दुकानातून चहा तसेच इतर वस्तू घेतल्या मात्र पैसे मागितल्याच्या कारणावरून त्याने संतप्त होऊन दुकानाची तोडफोड केली.ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सूत्रांच्या माहितीनुसार हा युवक एका पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे समजते. विशेष म्हणजे, घटनेच्या ठिकाणापासून अगदी हाकेच्या अंतरावरच पोलिस स्टेशन असतानाही अशा प्रकारची हिंमत गुन्हेगार दाखवत असल्याने पोलिसांचा वचक किती राहिला आहे, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे