
अकोला, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।अकोला शहरातील गंगानगर भागात असलेल्या सालासार बालाजी हनुमान मंदिर मध्ये आज चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील भागातुन प्रवेश करीत चोरी केली, चोरी करणाऱ्या चोरांनी मंदिराचे मोठे दरवाजे उघडण्यात प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न फसला अखेर त्यानी मंदिराच्या खिडकीचे गज लोखंडी अवजाराने तोडून मंदिरात प्रवेश करीत मंदिराचा दरवाजा आतमधून उघडून दान पेटी मंदिराच्या मागे आणीत त्या मधील अंदाजे 30 ते 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली, मिळालेल्या माहिती नुसार या चोरीच्या घटने मध्ये 4 ते 5 चोरट्याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे, सदर चोरीची माहिती कार्यरत असलेल्या चौकीदाराने आज सकाळी मंदिराच्या व्यवस्थापकांना दिली, मंदिराच्या व्यवस्थापकांनी घटनास्थळी पोहोचून सदर घटनेची माहिती जुने शहर पोलिसांना दिली या पक्षात जुने शहर पोलीस तसेच व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी घटनास्थळ गाठीत पंचनामा केला आहे, गेल्या एक महिना पूर्वी सुद्धा सालासार बालाजी हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला असल्याची माहिती मंदिराच्या व्यवस्थापकाने दिली आहे, मंदिराच्या परिसरात रात्रीला पोलिसांची गस्त ही वेळोवेळी होत नसल्याने सदरचा प्रकार घडला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत उचित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे