नांदेड, 23 ऑक्टोबर, (हिं. स) -
विश्व हिंदू परिषद बजरंग दल नांदेड व गोरक्षका तर्फे गोवंश वाचवण्यात यश मिळाले. गाई म्हशी आणि वासरू अवैध पद्धतीने मालवाहतूक करीत असताना विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि गोरक्षकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताचडीने कारवाई केली.
नांदेड शहरातील टापरे चौक धनेगाव ते हैदराबाद रोड या मार्गाने 3 आईशर गाडी ज्यात 11 गायी 4 वासरू तसेच काही म्हशी नेत असताना विश्व हिंदू परिषद बजरंग दल वाल्मिकी प्रखंड च्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली तातडीने त्या ठिकाणी गेले विचारपूस केली असता ते अवैधरित्या नेत होते हे लक्षात येताच ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती देत ह्या गाड्या ग्रामीण ग्रामीण पोलीस स्टेशनला जमा केल्या
या कार्यात वेळेवर गोरक्षक येऊन त्यांनी सुद्धा मदत केली. या प्रकाराबाबत
नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध गायी व म्हैशी क्रुरतेने कोंबुन वाहतुक करीत असलेले तिन आयचर वर एकुन 36,25,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis