गाई आणि म्हशींच्या अवैध वाहतूकप्रकरणी नांदेड पोलिसांनी 36 लाखाचा ऐवज केला जप्त
नांदेड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। ऐन दिवाळीत गाई आणि म्हशी क्रूरतेने तीन आयशर टेम्पोमध्ये घेऊन जात असताना नांदेड पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यांनी लगेच सापळा रचून या टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. एकूण 36 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात
अवैध वाहतूक


नांदेड, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। ऐन दिवाळीत गाई आणि म्हशी क्रूरतेने तीन आयशर टेम्पोमध्ये घेऊन जात असताना नांदेड पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यांनी लगेच सापळा रचून या टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. एकूण 36 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध गायी व म्हैशी क्रुरतेने कोंबुन वाहतुक करीत असलेले तिन आयशर पकडले. या आयशर टेम्पोमध्ये गाई आणि म्हशी कोंबण्यात आल्या होत्या. अवैध रीतीने गायी आणि म्हशीची वाहतूक केली जात होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत गाई आणि म्हशी ताब्यात घेतले आहेत

एकुण 36,25,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande