स्पाईसजेटचे पाटण्याला जाणारे विमान तांत्रिक समस्येमुळे दिल्लीला परतले
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर (हिं.स.) गुरुवारी सकाळी पाटण्याला जाणारे स्पाईसजेटचे विमान तांत्रिक समस्येमुळे उड्डाणानंतर लगेचच दिल्लीला परतले. विमान कंपनीने एक निवेदन जारी करून सांगितले की, विमान सामान्यपणे उतरले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
स्पाइस जेट विमानाचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर (हिं.स.) गुरुवारी सकाळी पाटण्याला जाणारे स्पाईसजेटचे विमान तांत्रिक समस्येमुळे उड्डाणानंतर लगेचच दिल्लीला परतले. विमान कंपनीने एक निवेदन जारी करून सांगितले की, विमान सामान्यपणे उतरले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले. पण विमानातील प्रवाशांची संख्या सांगितली गेली नाही.

स्पाईसजेटने सांगितले की, २३ ऑक्टोबर रोजी दिल्लीहून पाटण्याला जाणारे स्पाईसजेटचे विमान एसजी ४९७ तांत्रिक समस्येमुळे दिल्लीला परतले. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि आता ते पाटण्याला रवाना झाले आहे.

हे विमान बोईंग ७३७ विमानाने चालवले जात होते. एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतरच विमान पुन्हा सुरू केले जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande