भारत-ओमान लष्करप्रमुखांची तिसरी बैठक नवी दिल्लीत संपन्न
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।नवी दिल्ली येथे २२ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत भारत- ओमान या दोन्ही देशांदरम्यान तिसऱ्या आर्मी-टू-आर्मी स्टाफ टॉक्स बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य अधिक सखोल करण्यासाठी विवि
भारत-ओमान लष्करप्रमुखांची तिसरी बैठक नवी दिल्लीत संपन्न


नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।नवी दिल्ली येथे २२ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत भारत- ओमान या दोन्ही देशांदरम्यान तिसऱ्या आर्मी-टू-आर्मी स्टाफ टॉक्स बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य अधिक सखोल करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा केली. यामुळे भारतीय सेना आणि ओमानच्या रॉयल आर्मी यांच्यातील संरक्षण सहकार्य आणखी बळकट झाले आहे.

भारतीय सेनेच्या जनसंपर्क संचालनालयाने ‘एक्स’वर पोस्ट करताना म्हटले, “भारतीय सेनेने रॉयल आर्मी ऑफ ओमानसोबत संरक्षण सहकार्य अधिक दृढ केले आहे. दोन्ही सेनांदरम्यान तिसऱ्या आर्मी-टू-आर्मी स्टाफ टॉक्स नवी दिल्लीमध्ये २२-२३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्या.” या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य अधिक सखोल करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा केली. यात संयुक्त सैन्य सरावांचा विस्तार, विशिष्ट क्षेत्रांमध्ये तज्ज्ञांच्या देवाणघेवाणीचा कार्यक्रम, प्रशिक्षण सहकार्य वाढवणे, तसेच क्षमता विकास आणि सैन्य शिक्षणामध्ये नवीन भागीदारीच्या संधी शोधणे यांचा समावेश होता.या सर्व उपक्रमांना ‘डिफेन्स कोऑपरेशन प्लान २०२६’ अंतर्गत पुढे नेले जाईल. एडीजी पीआयने सांगितले की ही बैठक “सैन्य कूटनीती आणि भारत-ओमान संरक्षण सहकार्याला नवी दिशा देणारे पाऊल” आहे.

हे सहकार्य मागील वर्षी, सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या भारत-ओमान संयुक्त सैन्य सराव ‘अल नजाह’ च्या यशावर आधारित आहे, जो ओमानमधील रबकूट ट्रेनिंग एरिया येथे पार पडला होता. त्या सरावात दोन्ही सेनांनी उत्कृष्ट समन्वय आणि संयुक्त ऑपरेशनल क्षमता प्रदर्शित केली होती. या वर्षी झालेल्या स्टाफ टॉक्स च्या माध्यमातून त्या सहकार्याला संस्थात्मक स्वरूप देण्यावर आणि भविष्यात त्याला अधिक विस्तार देण्यावर भर देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande