केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लातूर शहरवासीयांना दिवाळी भेट
लातूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.) लातूर शहराबाहेरून जाणाऱ्या 60 किमी लांबीच्या पर्यायी रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यास नितीन गडकरी यांची सहमती झाली झाली असल्याचे औसा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू
रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण


लातूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)

लातूर शहराबाहेरून जाणाऱ्या 60 किमी लांबीच्या पर्यायी रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यास नितीन गडकरी यांची सहमती झाली झाली असल्याचे औसा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

आज नागपूर येथे देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांनी भेट घेतली. निम्नलिखित विकासकामांचा पाठपुरावा केला:

लातूर शहराबाहेरून जाणाऱ्या 60 किमी लांबीच्या पर्यायी रिंग रोडचे चौपदरीकरण: 'पेठ - चांडेश्वर - कव्हा - बाभळगाव - भातखेडा - खुलगापूर - नांदगाव - रायवाडी - हरंगुळ - खंडापूर - गंगापूर - पेठ' या 60 किमी लांबीच्या पर्यायी रिंग रोडला यापूर्वी राज्य मार्गाचा दर्जा देऊन 48 किमीचे भूसंपादनही करण्यात आले आहे. लातूर शहरात दररोज होत असलेली वाहतूक कोंडी व लातूर शहराचे झपाट्याने होत असलेले विस्तारीकरण विचारात घेऊन सदरील पर्यायी रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे अशी विनंती य केली. या प्रस्तावाला अतिशय सकारात्मकपणे घेत सहमती दर्शवली आहे.

त्यांनी बैठकीतूनच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्याशी फोनवर संपर्क साधून उर्वरित 12 किमी लांबीची भूसंपादन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून पर्यायी रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव त्यांच्या विभागाला सादर करण्यास सांगितले आहे. लातूर शहराबाहेरून जाणाऱ्या 60 किमी लांबीच्या पर्यायी रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मंजुरी प्रदान करण्यात येईल असा शब्द लातूर शहरवासीयांना दिला आहे.

आजचा हा निर्णय लातूर शहर व जिल्ह्यासाठी ऐतिहासिक असून या नवीन पर्यायी रिंगरोडमुळे लातूर शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे आणि शहराच्या विस्तारीकरणाला दिशाही मिळणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande