नांदेड : प्रियकराकडून प्रेयसीची हत्या
नांदेड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। लग्नासाठी सतत दबाव टाकणाऱ्या प्रियकराने अखेर प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पाटोदा येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मृत महिलेचे नाव मंगल (वय ४५) असे असून, ती
नांदेड :  प्रियकराकडून प्रेयसीची हत्या


नांदेड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। लग्नासाठी सतत दबाव टाकणाऱ्या प्रियकराने अखेर प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पाटोदा येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

मृत महिलेचे नाव मंगल (वय ४५) असे असून, ती पाटोदा गावात एकटी राहत होती. तिचा गावातील कृष्णा जाधव (वय ३५) याच्याशी प्रेमसंबंध होता. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. कृष्णा सतत “मंगल, माझ्याशी लग्न कर” असा आग्रह धरत होता. परंतु मंगल त्याला नकार देत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.कृष्णा मंगलच्या घरी गेला. तेथे पुन्हा लग्नाच्या मुद्यावरून वाद झाला आणि रागाच्या भरात कृष्णाने मंगलचा गळा आवळून तिची हत्या केली. खून केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.

मंगलची आई घरी गेली असता तिला मुलगी मृतावस्थेत आढळली. पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांनी कृष्णा जाधव यांच्या चपला जप्त केल्या असून, मंगलच्या बहिणीनेही आरोपीला घरातून पळून जाताना पाहिल्याची माहिती दिली आहे.या प्रकरणी मंगलचा भाऊ यांनी तक्रार दाखल केली असून, त्यावरून कृष्णा जाधव याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केले असून, त्याचा तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande