लावाने शार्क २ फोरजी स्मार्टफोन केला लाँच
मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावाने आपला नवीन बजेट स्मार्टफोन ‘लावा शार्क 2 4G’ फक्त 6,999 रुपये किमतीत बाजारात आणला आहे. या फोनमध्ये युनिकॉक T7250 हा ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला असून तो उत्कृष्ट परफॉर्मन्ससह वापरकर्त्यांन
Lava Shark 2 4G smartphone


Lava  Shark 2 4G smartphone


मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावाने आपला नवीन बजेट स्मार्टफोन ‘लावा शार्क 2 4G’ फक्त 6,999 रुपये किमतीत बाजारात आणला आहे. या फोनमध्ये युनिकॉक T7250 हा ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला असून तो उत्कृष्ट परफॉर्मन्ससह वापरकर्त्यांना उत्तम अनुभव देतो. लावा शार्क 2 मध्ये 6.75 इंचाचा एचडी+ डिस्प्ले असून त्याला 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट दिला आहे. मोठ्या स्क्रीनमुळे गेमिंग, व्हिडिओ पाहणे आणि स्क्रोलिंग अनुभव अधिक स्मूद होतो.

या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा एआय आधारित मुख्य कॅमेरा दिला असून तो सर्व प्रकाश परिस्थितीत स्पष्ट आणि रंगीत छायाचित्रे टिपण्यास सक्षम आहे. समोरच्या बाजूस 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी उपयुक्त आहे. फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध असून वापरकर्ते आवश्यकतेनुसार मेमरी वाढवू शकतात.

लावा शार्क 2 मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने बॉक्समध्ये 10W चार्जरही उपलब्ध करून दिला आहे. यूएसबी टाइप-सी पोर्टसह हा फोन अधिक जलद चार्जिंग अनुभव देतो.

फोनला IP54 रेटिंग मिळाली असून तो धूळ आणि पाण्यापासून संरक्षण प्रदान करतो. ड्युअल 4G सिम सपोर्ट, ऑटो कॉल रेकॉर्डिंग आणि अँड्रॉइड 15 या नवीन ऑपरेटिंग सिस्टिमचा समावेश यामुळे या किमतीत हा स्मार्टफोन विशेष ठरतो. लावा कंपनीने 1 ओएस अपडेट आणि 2 वर्षे सुरक्षा अपडेट देण्याचे आश्वासनही दिले आहे. लावा शार्क 2 4G हा फोन दोन आकर्षक रंगांमध्ये – इक्लिप्स ग्रे आणि ऑरोरा गोल्ड – उपलब्ध होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande