सोने - चांदीच्या घसरणीला ब्रेक
जळगाव, 30 ऑक्टोबर, (हिं.स.) सोने आणि चांदीने विक्रमी उंची गाठल्यानंतर त्याच वेगाने या मौल्यवान धातूंच्या किमतीत गेल्या काही दिवसांत घसरणही झाली. मात्र, आता या घसरणीला ब्रेक लागला आहे. जळगाव सुवर्णपेठेत सोन्याच्या भावात दीड हजार रुपयांची, तर चांदीच्
सोने - चांदीच्या घसरणीला ब्रेक


जळगाव, 30 ऑक्टोबर, (हिं.स.) सोने आणि चांदीने विक्रमी उंची गाठल्यानंतर त्याच वेगाने या मौल्यवान धातूंच्या किमतीत गेल्या काही दिवसांत घसरणही झाली. मात्र, आता या घसरणीला ब्रेक लागला आहे. जळगाव सुवर्णपेठेत सोन्याच्या भावात दीड हजार रुपयांची, तर चांदीच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने १० ग्रॅमसाठी एक लाख २० हजार रुपयांवर, तर चांदीचा भाव एक किलोसाठी एक लाख ४८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात चार हजार ३०० रुपयांनी, तर चांदीच्या भावात सहा हजार ५०० रुपयांची घसरण झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande