
पाटणा, २७ ऑक्टोबर (हिं.स.) काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव २९ ऑक्टोबर रोजी सकरा राखीव विधानसभा मतदारसंघ आणि दरभंगा येथे संयुक्त निवडणूक सभा घेणार आहेत. दोन्ही नेते संयुक्तपणे महाआघाडी समर्थित उमेदवारांसाठी जनतेचा पाठिंबा मागतील.
बिहार काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी सोमवारी याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, माजी काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा विधानसभा निवडणुकीसाठी हा पहिलाच बिहार दौरा आहे. ते सकरा राखीव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उमेश राम यांच्या समर्थनार्थ आयोजित पहिल्या जाहीर सभेला संबोधित करतील. ते दरभंगा येथे राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि महाआघाडीच्या उमेदवारांसाठी सभांना देखील संबोधित करतील. दोन्ही सभांमध्ये राजद नेते तेजस्वी यादव देखील उपस्थित राहतील. दोन्ही नेते महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन प्रदेशातील जनतेला करतील.
राहुल गांधी यांनी यापूर्वी बिहारमध्ये १६ दिवस घालवले होते. १,३०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीतील महाआघाडीच्या उमेदवारांसाठी त्यांच्या जाहीर सभा संयुक्तपणे घेतल्या जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे