
मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.) - आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकित भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी,रिपब्लिकन पक्ष या पक्षाच्या महायुतीची अभेद्य एकजुट राहणार आहे.महायुती राहिल एकजुट पण मनसेमुळे महाविकास आघाडीत पडली आहे फुट, असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज महाविकास आघाडीला लगावला.
आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील सर्व महानगरपालिका; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित महायुतीची भक्कम एकजुट राहणार आहे. मनसे हा पक्ष जर महाविकास आघाडीत येत असेल तर काँग्रेस पक्ष वेगळी निवडणुक लढवेल . त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये फुट पडेल हा आपला यापूर्वीच सांगितलेला अंदाज खरा ठरल्याचे आठवले यांनी सांगितले.
मनसे आणि उबाठा यांच्या युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये फुट पडलेली आहे.त्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक संस्थाच्या निवडणुकीत; मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागते. महायुती ही एकजुट भक्कम असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर निवडून येईल. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस मतदान मिळणार आहे. फूट पडलेल्या महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
दरम्यान सातारा जिल्हातील फलटण तालुक्यात महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या अत्यंत दुःखद आणि गंभीर प्रकार आहे.महाराष्ट्राच्या प्रतिमेला कंलक फासणारी घटना आहे.महिला डॉक्टर वर ज्यांनी अत्याचार केले ; ज्यांच्यामुळे महिला डॉक्टरला आत्महत्या करण्याची वेळ आली त्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे.या ऐतिहासिक जिल्ह्यात अशी घटना घडणे अत्यंत निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कार करणाऱ्या दोषी आरोपींचे हातपाय तोडून कडेलोट करण्याची शिक्षा केली जात होती.तशीच शिक्षा बलात्कार करणाऱ्यांना केली तर समाजात बलात्काराचे प्रकार मोठ्या प्रमाणात रोखता येतील, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या प्रकरणी गांर्भीयांने लक्ष घातलेले आहे. लवकरच या प्रकरणी दिवगंत महिला डॉक्टरला न्याय मिळेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी