मोंथा चक्रीवादळाचा विमान उड्डाणांवर परिणाम, विशाखापट्टणमवरील ३२ उड्डाणे रद्द
नवी दिल्ली , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।भीषण चक्रीवादळ “मोनथा” मुळे मंगळवारी (दि.२८) विशाखापट्टणम विमानतळावरून निघणाऱ्या एकूण ३२ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक एन. पुरुषोत्तम यांनी सांगि
मोंथा चक्रीवादळाचा विमान उड्डाणांवर परिणाम, विशाखापट्टणमवरील ३२ उड्डाणे रद्द


नवी दिल्ली , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।भीषण चक्रीवादळ “मोनथा” मुळे मंगळवारी (दि.२८) विशाखापट्टणम विमानतळावरून निघणाऱ्या एकूण ३२ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.

विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक एन. पुरुषोत्तम यांनी सांगितले की, २७ ऑक्टोबर रोजी एअर इंडिया एक्सप्रेसच्या दोन उड्डाणांनाही रद्द करण्यात आले होते. ते म्हणाले, “आम्ही दररोज साधारण ३० ते ३२ उड्डाणे चालवतो, ज्यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांचा समावेश असतो. मात्र आज सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.”पुरुषोत्तम यांनी सांगितले की, विमानतळाने भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार चक्रीवादळाच्या आधी आणि नंतर दोन्ही टप्प्यांसाठी आवश्यक सावधगिरीचे उपाय अवलंबले आहेत. तसेच, विजयवाडा विमानतळावर आज १६ उड्डाणे रद्द करण्यात आली, परंतु ५ उड्डाणे नियमितरित्या पार पडली.

विजयवाडा विमानतळाचे संचालक लक्ष्मीकांत रेड्डी यांनी सांगितले, “काल (सोमवारी) विशाखापट्टणमकडे जाणारे फक्त एकच उड्डाण रद्द झाले होते. पण आज दिल्ली, मुंबईसह देशातील विविध ठिकाणांसाठी १६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.” रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, एअरलाईन्सनी मंगळवारसाठीचे ऑपरेशन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, बुधवारच्या उड्डाणांच्या संदर्भात संध्याकाळपर्यंत परिस्थिती स्पष्ट होईल. याचप्रमाणे, तिरुपती विमानतळावर चार उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.दरम्यान, एका रेल्वे अधिकाऱ्याने माहिती दिली की, दक्षिण मध्य रेल्वे (SCR) विभागात २७ ऑक्टोबरपासून मंगळवारपर्यंत एकूण १२० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, चक्रीवादळ “मोनथा” मंगळवार संध्याकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande