दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला भीषण आग
नवी दिल्ली , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर आज, 28 ऑक्टोबर रोजी एअर इंडियाच्या विमानाजवळ उभी असलेल्या बसला अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलिस आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून आग
दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला भीषण आग


नवी दिल्ली , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 वर आज, 28 ऑक्टोबर रोजी एअर इंडियाच्या विमानाजवळ उभी असलेल्या बसला अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलिस आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून आग नियंत्रणात आणली. सुदैवाने त्या वेळी बसमध्ये कोणताही प्रवासी उपस्थित नव्हता, ज्यामुळे मोठा अपघात टळला.

सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये बस पूर्णपणे आगीच्या ज्वाळांमध्ये वेढलेली दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की ज्या बसला आग लागली आहे, तिच्या अगदी काही अंतरावर एअर इंडियाचे एक विमान उभे आहे. घटनेनंतर विमानतळावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता, परंतु आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे.

विमानतळ पोलिस उपायुक्त विचित्र वीर यांनी सांगितले की मंगळवारी दुपारी सुमारे 1 वाजता एअर इंडियाच्या एका बसमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. त्या वेळी बसमध्ये कोणताही प्रवासी किंवा सामान नव्हते,फक्त चालक उपस्थित होता. आग तात्काळ विझवण्यात आली असून कोणतीही जखमीची नोंद नाही आणि जवळच्या विमानांना देखील कोणताही इजा झाली नाही. सध्या बसची तपासणी सुरू असून आग लागण्याचे नेमके कारण शोधले जात आहे.

दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे, जिथे तीन टर्मिनल आणि चार रनवे आहेत. येथे दरवर्षी 100 दशलक्षाहून अधिक प्रवाशांची सोय केली जाते. T3 टर्मिनल हे जगातील सर्वात मोठ्या टर्मिनल्सपैकी एक असून दरवर्षी सुमारे 40 दशलक्ष प्रवाशांना सेवा देऊ शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande