भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासामुळे पाकिस्तानने केले हवाई क्षेत्र बंद
नवी दिल्ली , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।भारताच्या तीनही सैन्यदलांनी मिळून ३० ऑक्टोबरपासून पश्चिम सीमेवर “त्रिशूल” युद्धाभ्यास सुरू करण्याची तयारी केली आहे. भारतीय सैन्य यासाठी व्यापक तयारी करत आहे. भारताने या युद्धाभ्यासासाठी आधीच ‘नोटम’ (नोटीस टू एअर मिश
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासामुळे पाकिस्तानने केले हवाई क्षेत्र बंद


नवी दिल्ली , 28 ऑक्टोबर (हिं.स.)।भारताच्या तीनही सैन्यदलांनी मिळून ३० ऑक्टोबरपासून पश्चिम सीमेवर “त्रिशूल” युद्धाभ्यास सुरू करण्याची तयारी केली आहे. भारतीय सैन्य यासाठी व्यापक तयारी करत आहे. भारताने या युद्धाभ्यासासाठी आधीच ‘नोटम’ (नोटीस टू एअर मिशन्स) जारी केले आहे. भारताच्या या मोठ्या सैन्य सरावामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्यात खळबळ माजली आहे.

भारतीय सैन्याच्या या संयुक्त युद्धाभ्यासामुळे पाकिस्तान इतका घाबरला आहे की त्याने स्वतःच्या हवाई क्षेत्रासाठी जारी केलेल्या ‘नोटम’ चा व्याप आणखी वाढवला आहे. हा निर्णय पाकिस्तानच्या नौदलप्रमुखांच्या सर क्रीक परिसरातील दौऱ्यानंतर घेण्यात आला आहे. इस्लामाबादने २८ आणि २९ ऑक्टोबरसाठी नोटम जारी केले आहे.

दरम्यान, पाकिस्तान एअरपोर्ट्स अथॉरिटी (पीएए) ने कराची आणि लाहोर येथील हवाई मार्गांमध्ये काही बदल जाहीर केले आहेत. पीएए ने सांगितले की हे बदल हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी करण्यात आले आहेत. तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पाकिस्तानने हा निर्णय भारताच्या ‘त्रिशूल’ युद्धाभ्यासाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे.

“त्रिशूल” युद्धाभ्यासात सेना, हवाईदल आणि नौदलाचे सुमारे ३०,००० जवान सहभागी होणार आहेत. हा सराव ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. युद्धाभ्यासाचा परिसर राजस्थानच्या जैसलमेरपासून गुजरातच्या सर क्रीकपर्यंत पसरलेला असेल.

अलीकडेच पाकिस्तानचे नेव्ही चीफ सर क्रीक परिसराच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्यांनी आपल्या नौदलाच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला भारतातील संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सर क्रीक परिसराला भेट दिली होती आणि जवानांशी संवाद साधला होता.

त्या वेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक इशारा देत म्हटले होते की “सर क्रीकचा एक मार्ग कराचीपर्यंत जातो, हे पाकिस्तान विसरू नये.” त्यांनी स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली होती की “या क्षेत्रात शत्रूने कोणतीही मूर्खता केली, तर त्याचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलू शकतात.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande