ॲमेझॉन फायर टीव्ही स्टिक ४ के सिलेक्ट भारतात लॉन्च
मुंबई, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। ॲमेझॉनने भारतात आपला नवीन फायर टीव्ही स्टिक ४ के सिलेक्ट लॉन्च केला आहे. हा डिव्हाइस कंपनीच्या ४ के स्ट्रीमिंग लाइनअपमधील सर्वात परवडणारा पर्याय ठरणार असून त्याची किंमत ५,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा नवीन फायर टीव्ही स
Amazon Fire TV Stick 4K Select


मुंबई, 29 ऑक्टोबर (हिं.स.)। ॲमेझॉनने भारतात आपला नवीन फायर टीव्ही स्टिक ४ के सिलेक्ट लॉन्च केला आहे. हा डिव्हाइस कंपनीच्या ४ के स्ट्रीमिंग लाइनअपमधील सर्वात परवडणारा पर्याय ठरणार असून त्याची किंमत ५,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा नवीन फायर टीव्ही स्टिक अमेझॉन, ब्लिंकिट, स्विगी इन्स्टामार्ट, झेप्टो तसेच क्रोमा, विजय सेल्स आणि रिलायन्स रिटेलसारख्या प्रमुख ऑफलाइन स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

नवीन फायर टीव्ही स्टिक ४ के सिलेक्टमध्ये ४ के अल्ट्रा एचडी स्ट्रीमिंगसोबत HDR10+ सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिस्नी+ हॉटस्टार, यूट्यूब आणि झी5 यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवरील सामग्री सहज पाहता येते. तसेच अलेक्सा व्हॉइस कंट्रोल फीचरच्या मदतीने वापरकर्ते फक्त आवाजाच्या आदेशाने कंटेंट शोधू, बदलू किंवा प्लेबॅक नियंत्रित करू शकतात.

हा डिव्हाइस ॲमेझॉनच्या नवीन Vega ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. यात 1.7GHz क्वॉड-कोर प्रोसेसर असून, आतापर्यंतच्या सर्व फायर टीव्ही स्टिक मॉडेल्समधील हा सर्वात जलद प्रोसेसर आहे. या नव्या Vega OS मुळे ॲप्स जलद उघडतात, इंटरफेस अधिक स्मूथ वाटतो आणि एकूणच अनुभव अधिक वेगवान मिळतो.

फायर टीव्ही स्टिक 4K सिलेक्टमध्ये HDMI इनपुटसह HDCP 2.2 सपोर्ट आहे, ज्यामुळे वापरकर्ते त्यांचा जुना टीव्ही बदलल्याशिवाय 4K स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. HDR10+ तंत्रज्ञानामुळे अधिक उजळपणा, तीक्ष्ण कॉन्ट्रास्ट आणि अचूक रंग मिळून चित्रपट आणि मालिका पाहण्याचा अनुभव अधिक वास्तवदर्शी होतो.

या डिव्हाइसमध्ये भारतात पहिल्यांदाच फायर टीव्ही अॅम्बियंट एक्सपीरियन्स फीचर सादर करण्यात आले आहे. या सुविधेद्वारे टीव्ही न वापरताना स्क्रीनवर २,००० पेक्षा जास्त कलाकृती आणि छायाचित्रे स्क्रिनसेव्हरच्या स्वरूपात दाखवता येतात.

त्यासोबत मिळणाऱ्या अलेक्सा व्हॉइस रिमोटच्या साहाय्याने वापरकर्ते आवाजाच्या मदतीने व्हॉल्युम नियंत्रित करू शकतात, ॲप्स स्विच करू शकतात तसेच स्मार्ट होम डिव्हाइसेस – जसे की लाईट्स, एसी किंवा फॅन – देखील सहज नियंत्रित करू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande