पंतप्रधान नरेंद्र मोदी ३०-३१ ऑक्टोबर रोजी गुजरात दौऱ्यावर
नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय एकता दिन समारंभात सहभागी होतील आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय एकता दिन समारंभात सहभागी होतील आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहतील.

पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) माहितीनुसार, त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात, पंतप्रधान ३० ऑक्टोबर रोजी केवडिया येथील एकता नगर येथे पोहोचतील. आणि ते सुमारे १,१४० कोटी रुपयांच्या विविध विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या प्रकल्पांचे उद्दिष्ट पर्यटनाला चालना देणे, वाहतूक सुविधा सुधारणे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना बळकटी देणे आहे.

संध्याकाळी, पंतप्रधान बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठ (राजपिपला), हॉस्पिटॅलिटी जिल्हा (फेज १), वामन वृक्ष वाटिका, सप्तपुरा संरक्षण भिंत, ई-बस चार्जिंग डेपो आणि २५ इलेक्ट्रिक बसेस, नर्मदा घाट विस्तार आणि स्मार्ट बस थांबे (फेज २) यासारख्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. ते भारतातील रॉयल किंग्डम्स संग्रहालय, वीर बालक उद्यान, क्रीडा संकुल, रेन फॉरेस्ट प्रकल्प आणि ट्रॅव्हेलेटर यासारख्या प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील. या प्रसंगी पंतप्रधान सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त १५० रुपयांचे विशेष स्मारक नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन करतील.

३१ ऑक्टोबर रोजी, पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला, स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष्पहार अर्पण करतील आणि राष्ट्रीय एकता दिनाच्या समारंभात सहभागी होतील. ते एकता दिनाची शपथ देखील देतील आणि परेडचे निरीक्षण करतील.

या वर्षीच्या एकता दिनाच्या संचलनात विविधतेत एकता या थीमवर आधारित १० झांकी असतील, ज्यामध्ये एनएसजी, एनडीआरएफ, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, अंदमान आणि निकोबार, मणिपूर, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड आणि पुडुचेरी यांचा समावेश असेल. या कार्यक्रमात ९०० कलाकार भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरा सादर करतील.

पंतप्रधान आरंभ ७.० कार्यक्रमाच्या समारोप समारंभात १०० व्या फाउंडेशन कोर्सच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधतील. यावर्षी आरंभची थीम म्हणजे प्रशासनाची पुनर्कल्पना. भारताच्या १६ नागरी सेवा आणि भूतानच्या ३ नागरी सेवांमधील एकूण ६६० प्रशिक्षणार्थी या कोर्समध्ये सहभागी होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande