सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण
जळगाव, 29 ऑक्टोबर (हिं.स.)जळगाव सुवर्णपेठत सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. अर्थात सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर तर चांदी सहा हजार ५०० रुपयांनी घसरून एक लाख ४७ हजार रुपयांवर आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पह
सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण


जळगाव, 29 ऑक्टोबर (हिं.स.)जळगाव सुवर्णपेठत सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. अर्थात सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर तर चांदी सहा हजार ५०० रुपयांनी घसरून एक लाख ४७ हजार रुपयांवर आली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत जाऊन त्यांनी नवनवीन उच्चांक गाठला. मात्र आता गेल्या आठवड्यापासून चांदीत मोठी घसरण होण्यासह सोन्याचेही भाव कमी-कमी होत आहे. तर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली. सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख १८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. तर चांदी सहा हजार ५०० रुपयांनी घसरून एक लाख ४७ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. चांदीचे भाव २५ दिवसांच्या नीचांकीवर आले असून यापूर्वी ३ ऑक्टोबर रोजी चांदी एक लाख ४६ हजार ५०० रुपयांवर होती. त्यानंतर भाव सतत वाढत गेले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande