छिंदवाडा : आणखी 2 बालकांचा किडनी फेल्युअरमुळे मृत्यू
गेल्या 30 दिवसांमध्ये एकूण 9 बालकं मृत्यूमुखी पडलीछिंदवाडा, 03 ऑक्टोबर (हिं.स.) : मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात मुलांमध्ये किडनी फेल्युअरमुळे होणाऱ्या मृत्यूची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली असून, गेल्या सुमारे 30
किडनी लोगो


गेल्या 30 दिवसांमध्ये एकूण 9 बालकं मृत्यूमुखी पडलीछिंदवाडा, 03 ऑक्टोबर (हिं.स.) : मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात मुलांमध्ये किडनी फेल्युअरमुळे होणाऱ्या मृत्यूची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली असून, गेल्या सुमारे 30 दिवसांत मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे.

माहितीनुसार, बालकांमध्ये किडनी फेल्युअरमुळे मृत्यू होण्याची ही मालिका 4 सप्टेंबरपासून सुरू झाली होती, जेव्हा पहिला मृत्यू नोंदवला गेला होता. नागपूर येथे उपचारादरम्यान 1 ऑक्टोबरला आणखी एका मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 9 झाली आहे.अवघ्या एका महिन्यात मृतांची संख्या 9 वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झाले आहेत.

परासिया येथील एसडीएम सौरभ कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाने आतापर्यंत सुमारे 1400 बालकांचे स्क्रीनिंग केले आहे, आणि हे अभियान अद्याप सुरूच आहे. सध्या दररोज 120 मुलांची तपासणी केली जात आहे, जेणेकरून संभाव्य रुग्णांची लवकर ओळख होऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करता येतील.आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन या आजाराच्या मुळ कारणाचा शोध घेण्याचे आणि प्रभावित बालकांना योग्य उपचार देण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

या गंभीर प्रकरणावर छिंदवाडाचे जिल्हाधिकारी शैलेन्द्र सिंह यांनी सांगितले की, मुलांना त्यांच्या पालकांनी कोणाकडून औषध दिले होते, याची चौकशी केली जात आहे. जर एखाद्या बनावट डॉक्टराकडून औषध दिले गेले असेल, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.सध्या किडनी संक्रमणाचे कारण शोधण्यासाठी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande