संघटनातील शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार - आ. अमित देशमुख
लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी, मजूर आणि शेतीवर आधारित व्यावसायिकांना शासनाकडून योग्य प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही कॉंग्रेस आमदार अमित देशमुख यांनी दिली. बाभळगाव येथील एका
अ


लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी, मजूर आणि शेतीवर आधारित व्यावसायिकांना शासनाकडून योग्य प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही कॉंग्रेस आमदार अमित देशमुख यांनी दिली. बाभळगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सततची अतिवृष्टी, नदी नाल्यांना आलेला पूर यामुळे खरीप पिकांची पूर्णत: नासाडी झाली आहे, रब्बीची पेरणीही होईल की नाही अशी अवस्था आहे, रबीची पेरणी करायची ठरवली तरी खते, बियाणे विकत घेण्याचे ऐपती आता शेतकऱ्यांकडे राहिलेली नाही, या परिस्थितीत शासन ओला दुष्काळ मान्य करायला तयार नाही, शासनातील काही प्रतिनिधी पैशाचे सोंग करता येणार नाही असे बोलत आहेत, न मागता बुलेटट्रेन आणि शक्तीपीठ महामार्ग बांधण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यास तयार असलेले केंद्र आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रसंग आल्यानंतर मात्र हात आखडता घेताना दिसत आहे, असे सांगून अतिवृष्टीने अडचणीत आलेल्या शेतकरी आणि इतर सर्वच घटकांना शासनाकडून भरीव मदत मिळवून दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि आपण आपण स्वस्थ बसणार नाही असे आश्वासनही या प्रसंगी बोलताना दिले.

लातूरचे खासदार डॉ शिवाजी काळगे, वैशालीताई देशमुख काँग्रेस पक्ष तसेच जिल्ह्यातील विविध संस्थांचे मान्यवर पदाधिकारी यांच्यासह सहभागी झाले होते

उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे या प्रयत्नांना मर्यादा येत आहेत अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरायला हवी. नवे तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाला महत्त्व देऊन शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला हवेत. शेतीपूरक व्यवसाय उभारायला हवेत या कामी आपण सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचेही याप्रसंगी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande