सरकारने आर्थिक मदतीसह कर्जमाफी करावी - आ. रोहित पवार
लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उदगीर तालुक्याच्या विविध गावांना भेटी दिल्या. अतिवृष्टीमुळे उदगीर तालुक्याची मोठी नुकसान झाले आहे या शेती पिकाची त्यांनी पाहणी केली आहे. नळगीर (ता. उदगीर,
अ


लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उदगीर तालुक्याच्या विविध गावांना भेटी दिल्या. अतिवृष्टीमुळे उदगीर तालुक्याची मोठी नुकसान झाले आहे या शेती पिकाची त्यांनी पाहणी केली आहे.

नळगीर (ता. उदगीर, जि. लातूर) इथं अतिवृष्टीबाधित नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.

या अतिवृष्टीने तोंडचा घास हिरावल्याची व्यथा यावेळी शेतकऱ्यांनी मांडतानाच यातून सावरण्यासाठी सरकारने भरीव मदत करण्याची आणि कर्जमाफी करण्याची मागणी केली.

त्यांच्या या मागणीला अनुसरून सरकार विरोधात संघर्ष करुन मदत देण्यास भाग पाडू, असा विश्वास त्यांना दिला. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हंडरगुळी (ता. उदगीर. जि. लातूर) गावात तिरु नदीला आलेल्या पुरामुळं आजूबाजूची शेती पूर्णतः उध्वस्त झालीय. या उध्वस्त शेतीची पाहणी करून या संकटामुळं खचलेल्या बळीराजाशी चर्चा केली आणि त्यांना धीर दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande