अमरावती जिल्ह्यात साथीच्या आजारात मलेरियाचा धोका
अमरावती, 3 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्ह्यात सध्या व्हायरल फिव्हरने कहर केला असून, घरोघरी रुग्ण दिसत आहेत. अशातच डासजन्य आजार त्यात भर घालत आहेत. हेच कारण आहे की, जिल्हावासी बदलते वातावरण व डास अशा चक्रव्यूहात अडकले असून, आजारांना बळी पडत आहेत. जिल्ह्यात ड
जिल्ह्यात साथीच्या आजारात मलेरियाचाच धोका अधिक आरोग्य विभाग म्हणते काळजी घेणे गरजेचे


अमरावती, 3 ऑक्टोबर (हिं.स.)

जिल्ह्यात सध्या व्हायरल फिव्हरने कहर केला असून, घरोघरी रुग्ण दिसत आहेत. अशातच डासजन्य आजार त्यात भर घालत आहेत. हेच कारण आहे की, जिल्हावासी बदलते वातावरण व डास अशा चक्रव्यूहात अडकले असून, आजारांना बळी पडत आहेत. जिल्ह्यात डासांपासून मलेरियाचाच धोका जास्त दिसून येत आहे. कारण, या वर्षातील आकडेवारी बघितली असता डेंग्यू व चिकुनगुनियापेक्षा मलेरियाचेच रुग्ण जास्त दिसून येत आहेत. आतापर्यंत १00 च्या वर अधिक रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.

पावसाळा म्हटला, म्हणजे आजारांचाच काळ असतो. त्यानुसार, जिल्ह्यात सध्या व्हायरल फिव्हरने नाकीनऊ आणले आहे. घराघरांत तापाचे रुग्ण निघत असतानाच डासांनीही मलेरियाचा प्रसार सुरू केला आहे. जिल्ह्याला डासांचे ग्रहण असून, त्यांचा नायनाट करणेही शक्य नाही अशी स्थिती आहे. ही बाब शहरापुरतीच मर्यादित नसून अवघ्या जिल्ह्यालाच डासांनी ग्रासून सोडले आहे. डासांपासून मलेरिया व डेंग्यूचा धोका जास्त आहे. मात्र, जिल्ह्यात डेंग्यूपेक्षा मलेरियाचा जास्त धोका दिसून येत आहे. या वर्षातील आकडेवारी बघितली असता जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत मलेरियाच्या १00 हुन अधिक रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. तर, डेंग्यू रुग्णांची त्यापेक्षा कितीतरी कमी आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी मलेरिया रुग्णांचीच संख्या जास्त असल्याचे हमखास दिसून येते. यामुळेच जिल्ह्यात मलेरियाचाच धोका जास्त आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande