नांदेड, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील मौजेहोंडाळा ता. मुखेड येथीलडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकती पुतळ्या करिता सव्वा लाख रुपये दिले व यापुढे या परिसरातील सुशोभीकरण करण्यासाठी 05 लाख रुपये निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासन मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी दिले आहे
तसेच मातंग समाजासाठी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा करिता सव्वा लाख रुपये देईल व परिसरातील सुशोभीकरण करण्यासाठी 05 लाख रुपये निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासन दिले. मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील मौजे होंडाळा ता. मुखेड येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळाचे अनावरण सोहळा निमित्त उपस्थित राहून पूर्णाकृती पुतळाचे अनावरण केले. यावेळी संतोष बोंडलेवाड, नागनाथ लोखंडे, संग्राम अप्पा मळगे, राजीव घोडके, मनोज गोंड, गंगाधर पिटलेवाड, सह स्मारक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व माता भगिनी आणि समस्त गावकरी मंडळी आदी उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis