अमरावती, 3 ऑक्टोबर (हिं.स.)अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, गुन्हे शाखा अमरावतीने चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी संगरम विनायकराव वानखडे यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे आरोपी इसरार खान (वय 31) आणि सैयद तनवीर (वय 21), दोघेही राहणार रहमत नगर, यांना अटक करण्यात आली. त्यांनी दोन घरफोड्यांची कबुली दिली असून, एकूण ₹1,26,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल अन्य गुन्ह्यातील फरार आरोपी भारत उर्फ मक्की घूगे (वय 28) व अभिषेक जाधव (वय 24) यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त अरविंद वावरे, उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि. संदीप चव्हाण, सपोनि अमोल कडू, महेश इंगोले, मनिष वाकोडे व त्यांच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी