सोलापूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय हाय-प्रोफाइल कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून तब्बल ८३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत ५ चोरीच्या आलिशान कार जप्त करण्यात आल्या. या कारवाईन्वये दिल्लीतील पाच गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
हे आरोपी दिल्लीला विमानाने जाऊन तेथील हाफिज (रा. मेरठ) व लखविंदर सिंह (रा. रायपूर) यांच्याकडून चोरीच्या गाड्या महाराष्ट्रात आणत होते. त्यानंतर गाड्यांचे मूळ इंजिन व चेसी नंबर काढून बनावट नंबर बसवत आणि खोटे आरटीओ रजिस्ट्रेशन तयार करून विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पथकाने ४ आलिशान कार, मोबाइल हँडसेट असा ८३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ३१८ (४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड