चंद्रपूर पोलिस दलाचे शुक्रवारी ‘वॉक फॉर युनिटी’
चंद्रपूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता ‘वॉक फॉर युनिटी’ या विशेष पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय एक
चंद्रपूर पोलिस दलाचे शुक्रवारी ‘वॉक फॉर युनिटी’


चंद्रपूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता ‘वॉक फॉर युनिटी’ या विशेष पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकता, सामाजिक सौहार्द आणि देशप्रेमाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, सरदार वल्लभभाई पटेलांच्या विचारांप्रमाणे अखंड भारताची भावना जनमानसात रुजवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आाहे. शौर्य, सेवा आणि एकतेचा संदेश देणा-या रॅलीची सुरुवात श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पटेल हायस्कुल समोरून होणार असून समारोप पोलीस मुख्यालय येथे समाप्त होईल. पोलिस अधिकारी- अंमलदार, एनसीसी कॅडेट, एनएसएस विद्यार्थी, इतर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध समाजसेवी संघटना तसेच नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande