कार्तिकी यात्रेत पाणी, ज्युसच्या 12 लाख बाटल्यांचे होणार वाटप
सोलापूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या अतिवृष्टीचा फटका पंढरपूर शहरातील रस्त्यांना देखील बसला आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभुमिवर अडीच कोटी रुपये खर्चुन पंढरपू
कार्तिकी यात्रेत पाणी, ज्युसच्या 12 लाख बाटल्यांचे होणार वाटप


सोलापूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या अतिवृष्टीचा फटका पंढरपूर शहरातील रस्त्यांना देखील बसला आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभुमिवर अडीच कोटी रुपये खर्चुन पंढरपूर शहारातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. कार्तिकी यात्रेत येणाऱ्या वारकरी, भाविकांसाठी प्रशासनाकडून सहा लाख पाणी बाटल्या तर 6 लाख ज्युस बाटली वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

पंढरपूर कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभुमिवर भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलीस उपाधिक्षक प्रशांत डगळे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसिलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande