उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयांशी संवाद
बीड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉक्टर संपदा मुंडे या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. फलटण रुग्णालयात कवडगाव येथील संपदा मुंडे या डॉक्टरने महिलेने आत्महत्या केली. त्याचे पडस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयांशी संवाद


बीड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉक्टर संपदा मुंडे या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. फलटण रुग्णालयात कवडगाव येथील संपदा मुंडे या डॉक्टरने महिलेने आत्महत्या केली. त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आहेत. विविध पक्षाचे स्थानिक नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याची दखल घेऊन महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला.

या वेळी कुटुंबीयांनी महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.

अलीकडेच महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी काही विधान पत्रकार परिषदेत केले होते यासंदर्भात कुटुंबीयांनी त्यांना सांगितल्यानंतर

त्यावेळी अजित पवारांनीही याबाबत मी त्यांना विचारणार असल्याचे सांगितले. तसेतच मुख्यमंत्र्यांशी देखील या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले आहे.

अजित पवार म्हणाले, रूपाली चाकणकर यांच्या मताशी आम्ही सहमत नाहीत. या संदर्भात आम्ही- रूपाली चाकणकर यांना विचारणा करणार आहे. त्यांच्या मताचे कोणीही आम्ही समर्थन करणार नाही. तसेच त्यांनी असं का केलं याचं कारण विचारणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande