सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला - मनोज जरांगे
नागपूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात शेतकरी कर्जमाफीसह 22 प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिला, आमचेही आंदोलन होते, आणि सरकारने जे डाव टाकले आहेत, त्याचा प्रतिडाव टाकणे आवश्यक आह
मनोज जरांगे आ. कडू यांच्याशी चर्चा करताना


नागपूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात शेतकरी कर्जमाफीसह 22 प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिला, आमचेही आंदोलन होते, आणि सरकारने जे डाव टाकले आहेत, त्याचा प्रतिडाव टाकणे आवश्यक आहे. जरांगे यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत, पहिल्याच दिवशी सरकारने कोर्टाचा डाव टाकला, आणि त्यामुळे आंदोलनाचा रस्ता अधिक कठीण झाला आहे, असे सांगितले.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, मी इथे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आलो आहे. आपल्या आंदोलनाने सरकारला डाव टाकण्याची परवानगी दिली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि आंदोलनाला दडपून टाकू नये. आपण शेतकरी आंदोलनात उभे आयुष्य घालवले आहे. मी मुंबईच्या बैठकीत पडणार नाही. तुम्ही जा किंवा नका जाऊ, परंतु सरकारने टाकलेल्या डावाला प्रतिडाव टाकणे आवश्यक आहे.बच्चू कडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज सायंकाळी सात वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकरी कर्जमाफी आणि इतर २२ प्रमुख मागण्यांवर चर्चा होईल. कडू यांनी स्पष्ट केले की, आंदोलनाच्या मूळ मागण्या मान्य होईपर्यंत हे थांबणार नाही. सरकारला तडजोडीला तयार करणे आवश्यक आहे.

न्यायालयाने घेतली दखल

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी बुधवारी जनहित याचिका दाखल करून घेतली. न्यायालयाने शेतकरी आंदोलनामुळे होणाऱ्या सार्वजनिक त्रासाची गंभीर दखल घेतली. त्यांनी कडू आणि इतर आंदोलकांना वर्धा रोडसह इतर प्रमुख रस्ते तातडीने मोकळे करण्याचे आदेश दिले. बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांच्यासारख्या नेत्यांनी सरकारच्या धोरणावर ठाम भूमिका घेतली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे हित आणि त्यांच्या न्यायाच्या मागणीसाठी संघर्ष सुरू आहे. सरकारने कडूंच्या आंदोलनावर लक्ष ठेवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मूळ मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande